Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
May 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी
       
औरंगाबाद : औरंगाबादमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवराच्या (Salim Ali Lake) संवर्धनासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका जरिना जावेद कुरैशी यांनी सरोवराला आंतरराष्ट्रीय दर्जाचा लूक देण्यासाठी विशेष आराखडा महापौर समीर राजूरकर यांच्यासमोर सादर केला. या प्रस्तावावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली असून, पर्यावरण आणि वारसा जपण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला.

सरोवर संवर्धनाच्या चर्चेत इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनीही सहभाग घेतला. त्यांनी सलीम अली सरोवराचा ऐतिहासिक वारसा आणि त्याची सध्याची बिकट अवस्था अधोरेखित करत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. मलिक अंबर यांनी १६१० ते १६१६ दरम्यान शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. या पाझर तलावामुळे परिसरातील विहिरींना शुद्ध पाणी मिळत असे, तसेच तलावात कमळांचीही मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती.

डॉ. शेख यांनी सांगितले की, १९८० नंतर तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जाऊ लागल्याने जैवविविधतेवर गंभीर परिणाम झाला. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सिडको प्रशासनाने ड्रेनेजचे पाणी रोखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षांनंतरही समस्या कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेने यापूर्वी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून सरोवर परिसराचे सुशोभीकरण केले होते. मात्र, पर्यावरणप्रेमींनी यास विरोध दर्शवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. नागरिकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सरोवर परिसरातील प्रवेश मर्यादित करण्यात आला होता.

दरम्यान, ड्रेनेज समस्येवर उपाय म्हणून उभारण्यात आलेला एसटीपी प्रकल्प सध्या बंद अवस्थेत असून, तुलनेने कमी खर्चात ही समस्या सोडवता येऊ शकते, असेही डॉ. शेख यांनी स्पष्ट केले. सलीम अली सरोवराचे संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकास यासाठी प्रशासनाने आता ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: aurangabadHistoricalMaharashtraSalim Ali Lakeऔरंगाबाद
Previous Post

भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

Next Post

कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 
बातमी

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे. याआधी अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आता साहिल वाकोडे! आयआयटी...

Read moreDetails
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

September 19, 2026
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home