Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Akash Shelar by Akash Shelar
May 21, 2026
in बातमी
0
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक
       
दंड रद्द करून अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम

अकोला, ता. २० मे : शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित खोट्या तक्रारीवरून एका महिला शेतकरी कुटुंबावर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याच्या प्रकरणावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे यांची भेट घेत या निर्णयाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच दंड तातडीने रद्द करून शासकीय रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

शेतकरी लता लांडे, मारोती ढोरे आणि सुरेश निंबेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीनुसार, काही शेतकऱ्यांनी झाडे तोडून तसेच विहिरीवरील मुरूम शेतात टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर मंडळ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सरकारी साखळी रस्ता अडवून ठेवणारे तक्रारदारच असल्याचा दावा शेतकरी व युवा आघाडीने केला आहे. या प्रकरणात दि. १० एप्रिल २०२६ रोजी महिला शेतकरीपुत्र रवि दुतोंडे यांच्यावर तहसीलदारांनी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

मात्र, दुतोंडे यांची शेती बेलोरा येथे असून संबंधित रस्त्याशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. माझोड येथील गट क्रमांक ३५७, ३५८ आणि ३६० जवळील शासकीय रस्ता तक्रारकर्त्यांनीच अडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी तहसीलदारांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा निर्णय राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला.

घरकुल, विहिरीवरील माती, दगड व मुरूम शेतात किंवा अन्य ठिकाणी नेण्यासाठी रॉयल्टी लागत नसल्याचा शासन निर्णयही त्यांनी तहसीलदारांकडे सादर केला. तसेच मंडळ अधिकाऱ्यांचा स्थळ पाहणी अहवाल बनावट असल्याचाही आरोप करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडीने ३२ लाखांचा दंड त्वरित रद्द करावा, शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत आणि भूमी अभिलेख विभागामार्फत पोलिस बंदोबस्तात मोजणी करून पावसाळ्यापूर्वी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी हे प्रकरण पुन्हा तपासून आठ दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, सुगत डोंगरे, अमोल वानखडे, साहिल बोदडे, निशिकांत सदार, हर्षल लोखंडे यांच्यासह जयंत खंडारे, रवींद्र दुतोंडे, गणेश घोगरे, गजानन फोटोकार, बाजीराव खंडारे, अशोक गायकवाड, मनोर काटे, भिकाजी खंडारे, चंदन इंगळे, मुंगुटराव खंडारे, सिद्धार्थ वानखडे, देवेंद्र इंगळे, ज्ञानदेव खंडारे, रामभाऊ गवई, सुरेश खंडारे, आदित्य खंडारे, नाजूकराव खंडारे, प्रवीण खंडारे, महादेव पवार, रवी ढवळे, खुशाल खंडारे, संकेत खंडारे आणि अरुण खंडारे उपस्थित होते.

Tags: Akola newsFarmer ProtestGovernment Road EncroachmentTehsildar ControversyVanchit Bahujan Yuva Aghadi
Previous Post

पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

Next Post

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home