Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात

Akash Shelar by Akash Shelar
May 19, 2026
in Uncategorized
0
पुणे तिथे गुन्हे : जुन्या वादातून रिक्षाचालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, तिन्ही आरोपी ताब्यात
       
पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढणारी एक धक्कादायक घटना कात्रज परिसरात समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवरील राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक येथे भरदिवसा एका रिक्षाचालकावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना १८ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुरज माणिक काळे (वय ३०, रा. कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही आरोपी रिक्षाचालकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरज काळे आणि आरोपी यांच्यात दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सुरज काळे यांना दत्तनगर चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात गाठले. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्यावर थेट वार करण्यात आले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरज काळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गजबजलेल्या चौकात अशा प्रकारे धारदार हत्याराने हल्ला होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

गुणवत्तेचा खून करणारे कोण : आरक्षणवादी की भ्रष्ट दलाल?

Next Post

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Next Post
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home