Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत

Akash Shelar by Akash Shelar
May 18, 2026
in बातमी
0
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत
       

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात सीबीआयने महाराष्ट्रात धाडसत्र सुरूच ठेवले असून पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर जिल्ह्यातील अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात लातूर कनेक्शन अधिक गडद होत असल्याचे चित्र समोर येत असून, सीबीआयने शहरातील हालचालींना पुन्हा वेग दिला आहे. आरसीसी या खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना चौकशीनंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी तब्बल ११ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयचे पथक त्यांच्या ट्युशन क्लासमध्ये दाखल झाले होते. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, संगणक आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आज सकाळी पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अधिकृत अटक करण्यात आली.

दरम्यान, लातूरमधील ट्युशन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल दुपारपासून सीबीआयने शहरातील विविध ठिकाणी छापेमारी करत डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी केली. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर या तपासाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी शिवराज मोटेगावकर यांच्या सुतमील परिसरातील निवासस्थानी दाखल झाले होते.

घरातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांच्या नोंदी तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर उद्योग भवन परिसरातील आरसीसी कार्यालयातही तपास करत विविध माहिती आणि नोंदी गोळा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आजही सीबीआयचे पथक आरसीसी कार्यालयात तपास करत असून संपूर्ण कारवाईबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जात आहे. लातूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि सीबीआय अधिकाऱ्यांची उपस्थिती यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात सीबीआयकडून सलग चौकशी आणि छापेमारी सुरू असून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा आहे. मात्र, तपासादरम्यान नेमके काय पुरावे मिळाले, पुढील कारवाई कोणावर होणार किंवा नवीन गुन्हे दाखल होणार का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

NEET पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लातूरमधील विविध ट्युशन क्लासेसच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरसीसी क्लासबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


       
Tags: CBIRaidLaturNewsNEETPaperLeakRCCClassesShivrajMotegaonkar
Previous Post

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

Next Post

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

Next Post
RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

RTI कायद्याच्या कक्षेबाहेर BCCI; माहिती आयोगाच्या निर्णय !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home