Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी फडणवीसांना जबाबदार धरा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आयोगाकडे मागणी

Akash Shelar by Akash Shelar
April 24, 2026
in बातमी
0
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी फडणवीसांना जबाबदार धरा ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आयोगाकडे मागणी
       
पुणे : भीमा-कोरेगाव येथील दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरावे, तसेच आवश्यक पुरावे सादर न केल्यास आयोगाने त्यांच्याविरोधात विपरीत निष्कर्ष (अॅडव्हर्स इन्फरन्स) काढावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे केली आहे.

या संदर्भात ॲड. आंबेडकर यांच्या वतीने आयोगाकडे अर्ज दाखल करण्यात आला असून, शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. ते पत्र सादर न केल्यास संबंधितांविरोधात आयोगाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.

या प्रकरणात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २०२१ मध्ये पाठवलेले पत्र आयोगासमोर आणण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या पत्रात दंगलीची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. आयोगाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले असून या मागणीमुळे भीमा-कोरेगाव प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. फडणवीस आणि त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत, अशी मागणीही ॲड. आंबेडकर यांनी केली आहे.

Tags: Bhima KargaonDevendra FadanvisMaharashtraSharad PawarUddhav ThackerayVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक उद्ध्वस्त करते – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. आंबेडकर जयंती भव्यतेने साजरी करण्याची मागणी; पुतळा उभारणीचाही प्रस्ताव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
August 25, 2026
0

धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील...

Read moreDetails
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home