Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 

mosami kewat by mosami kewat
April 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एमपीएससी गट-ब परीक्षेत SC  विद्यार्थ्यांना शून्य जागा; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला जाब 
       
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर केली असून PSI, STI आणि ASO पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. मात्र, या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी जागा शून्य असल्याचा गंभीर मुद्दा समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, जर अधिकृत जाहिरातीत आरक्षणाचा योग्य वाटा दिलेला नसेल, तर हा प्रकार केवळ प्रशासनिक त्रुटी म्हणून पाहता येणार नाही. हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर थेट हल्ला मानला जाईल. त्यामुळे सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ स्पष्ट भूमिका मांडून वास्तविक परिस्थिती जाहीर करणे अत्यावश्यक आहे. (MPSC Group B 2026)

संवेदनशील विषयांवर अस्पष्टता ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे असल्याचेही आघाडीने नमूद केले आहे. वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या गोंधळात टाकणे हे अत्यंत गैरजबाबदारपणाचे लक्षण असल्याची टीका करण्यात आली आहे.

आरक्षण हा संविधानिक अधिकार असून त्याबाबत कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे ठामपणे सांगत, सरकार आणि आयोगाने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, आरक्षणाचा संपूर्ण तपशील पारदर्शकपणे मांडावा आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (MPSC Group B 2026)

तसेच, वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठामपणे उभी असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणताही खेळ सहन केला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार संधीची समानता (संविधान कलम १६) सुनिश्चित करावी आणि PSI पदासाठी वयोमर्यादेत वाढ द्यावी, हीही आघाडीची प्रमुख मागणी आहे.

Tags: EducationMaharashtraMPSCmpsc examPoliticalUpscVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जपान हादरले! ७.४ रिश्टर स्केल भूकंपाचा मोठा धक्का; त्सुनामीचा इशारा जारी

Next Post

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 

Next Post
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘Z+’ सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या 'Z+' सुरक्षेबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली; सुमारे 40 ते 50 लाख प्रतिमाह सुरक्षेवर जनतेच्या तिजोरीतून खर्च! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home