Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साकोली येथे भीम जयंतीनिमित्त केक कटिंग व सामूहिक भोजन कार्यक्रम उत्साहात

mosami kewat by mosami kewat
April 18, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
साकोली येथे भीम जयंतीनिमित्त केक कटिंग व सामूहिक भोजन कार्यक्रम उत्साहात
       

साकोली : महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडी, भंडारा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी जयंती निमित्त केक कटिंग कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी आलू भात व मट्ठा कढीचे सामूहिक भोजन आयोजित करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतून उभे राहत त्यांनी मानवमुक्तीचा लढा दिला. शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना घडवण्याचा त्यांचा ध्यास होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संरक्षण दिले.

महिला, कामगार, शेतकरी तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हाच विकासाचा मार्ग असल्याचा संदेश त्यांनी दिला आणि तोच संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात तनुजा नागदेवे, अमित नागदेवे, यादोराव गणवीर, गणेश गजभिये, करूणा शहारे, यशपाल गजभिये, भाग्यशाली मेश्राम, रोशन मेश्राम, बबीता राउत, जोशना खोबरागडे, प्रेमचंद खोबरागडे, कोकीळा रामटेक, नितेश डोंगरे, खुशी सहारे, गीता वलसाड, सविता डोंगरे, माला राउत, स्नेहा श्री खाडेकर, मनोज मडामे, जीतू वालथरे, रजनीश कराडे, कुसुम श्यामकुवर, अमावस्या नागदेवे, प्रतिमा पारधी, अशोक पारधी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांप्रमाणे समाजघडणीसाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.


       
Tags: Dr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मल्याळम टीव्हीविश्वात शोककळा; अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन

Next Post

राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Next Post
राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

राहुरीत संतोष चोळके यांच्या सभेत दिशा शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home