Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

पुणे : पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर खासगी कंपनीमार्फत चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध करत, शिक्षण क्षेत्रात ‘कंपनी राज’ आणण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे.

खानवडी येथील ‘जोती-सावित्री’ जिल्हा परिषद शाळा ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ या खासगी कंपनीकडे चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. राज्यातील पहिली PPP तत्त्वावरील शाळा म्हणून या प्रकल्पाचा उल्लेख केला जात असला, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणाचे खासगीकरण होत असल्याची टीका करण्यात येत आहे.

Also Read : ‘वंचित’चा दणका: विष्णुपूरी ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार, १५ दिवसांत फी परताव्याचे आश्वासन

दरम्यान, या शाळेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. मात्र, फुले यांच्या जन्मभूमीतच शिक्षणाचे व्यापारीकरण सुरू करणे हा त्यांच्या विचारांचा अपमान असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, “महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची दारे खुली केली. त्याच ठिकाणी शिक्षणाचे खासगीकरण करणे ही गंभीर बाब आहे.”

Also Read : पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

याशिवाय, PPP मॉडेलमुळे शिक्षक भरती व शाळा व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे गेल्यास आरक्षणाच्या नियमांना बगल दिली जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाचे अस्तित्व धोक्यात येईल, असेही आघाडीचे मत आहे.

शिक्षण हा राज्याचा घटनात्मक अधिकार असून तो नफ्यासाठी खासगी कंपन्यांकडे सोपवणे योग्य नसल्याचे आघाडीने स्पष्ट केले आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: Devendra FadnavisEducation PrivatisationKhanwadiMaharashtra politicsPolicy DebatePPP SchoolPublic SchoolsPune NewsReservation RightsRight To EducationSave Public EducationSocial JusticeStudent RightsVanchit Bahujan AghadiVBA protest
Previous Post

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

Next Post

राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home