बारामती : आज राहुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शैलाजा अरुण साबळे यांनी पक्षाच्या निवडणूक निधीसाठी ५०,००० रुपयांची देणगी देत आपला पाठिंबा व्यक्त केला.
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष चोळके हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या देणगीतून स्थानिक पातळीवर पक्षाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अधोरेखित होत आहे.
Also Read : वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी
कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या धोरणांवर आणि आगामी निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शैलाजा साबळे यांच्या या आर्थिक योगदानामुळे निवडणूक प्रचाराला निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...
Read moreDetails






