Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

mosami kewat by mosami kewat
March 19, 2026
in बातमी, मनोरंजन, सामाजिक
0
‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन
       

टोकियो: “डोरेमॉन… डोरेमॉन…” या गाण्याने जगभरातील कोट्यवधी मुलांचे बालपण रंगीबेरंगी करणाऱ्या अ‍ॅनिमेशन सृष्टीतील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. ‘डोरेमॉन’ या अजरामर मालिकेचे दिग्दर्शक आणि जपानचे ‘राष्ट्रीय अ‍ॅनिमेशन जनक’ शिबायामा त्सुतोमू यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ६ मार्च २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या निधनाचे वृत्त १७ मार्च रोजी अधिकृतपणे समोर आले.

गेल्या काही काळापासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाशी (Lung Cancer) झुंज देत होते. त्यांच्या निधनाने केवळ जपानच नव्हे, तर भारतातील घराघरांत पोहोचलेला निळा-पांढरा रोबोटिक मांजर ‘डोरेमॉन’ आज खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. (Doremon Cartoon)

शिबायामा यांनी केवळ एक मालिका दिग्दर्शित केली नाही, तर त्यांनी कल्पनाशक्तीचे एक नवे विश्व उभे केले. १९७९ मध्ये सुरू झालेला ‘डोरेमॉन’चा प्रवास त्यांनी तब्बल २२ चित्रपटांपर्यंत यशस्वीपणे नेला. १९७८ मध्ये त्यांनी स्वतःचा ‘अजिया-दो अ‍ॅनिमेशन वर्क्स’ स्टुडिओ सुरू करून अ‍ॅनिमेशन क्षेत्रात क्रांती घडवली. नोबिताची निरागसता, शिजुकाची समजदारी, जियानची दादागिरी आणि सुनिओची हुशारी… या पात्रांच्या माध्यमातून शिबायामा यांनी मुलांवर मैत्री आणि संकटात एकमेकांना मदत करण्याचे संस्कार केले. ‘डोरेमॉन’च्या पिशवीतून निघणाऱ्या गॅझेट्सनी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख दिले. (Doremon Cartoon)

शिबायामा यांनी या फ्रँचायझीवर आधारित तब्बल २२ चित्रपट दिग्दर्शित करून या मालिकेची लोकप्रियता पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच ‘डोरेमॉन’ आजही भारतातील प्रत्येक घरात तेवढ्याच उत्साहाने पाहिला जातो.


       
Tags: AnimationCartoonDesignerDirectorDoremonDoremon CartoonentertainmentGraphicKidsNobitaPlayers
Previous Post

कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

Next Post

मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

Next Post
मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home