Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !
       

मुंबई : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास 30 दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना थेट सवाल करत म्हटले की, आपले आर्थिक व्यवहार आता अमेरिका ठरवत आहे का?

रशियन तेल भारताला पुरवण्यास अमेरिकेने मान्यता दिल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला की, “परवानगी कोण देत आहे? आपल्या व्यापार करारांमध्ये आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांमध्ये आपल्याला काहीही स्वायत्तता उरलेली नाही का? भारत अमेरिकेचे ५१वे राज्य बनले आहे का? आपले आर्थिक व्यवहार आता अमेरिका ठरवत आहे का?” (Prakash Ambedkar)

आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिश साम्राज्याच्या सत्तेसमोर निष्ठा पत्करली होती. आज भारतीय जनता पक्ष त्या परंपरेलाच पुढे नेत अमेरिकेच्या आदेशानुसार काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांमध्ये स्वायत्तता टिकवली पाहिजे, अन्यथा देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash Ambedkar)

रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्तरावर तेल व्यापार आणि निर्बंधांचा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या भूमिकेचा दाखला देत भारताच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.


       
Tags: americaEconomicsgovernmentnarendra modipmPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

Next Post

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Next Post
अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

अकोला महानगरपालिकेत 'वंचित' चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

by mosami kewat
May 6, 2026
0

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर...

Read moreDetails
मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

May 5, 2026
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

May 5, 2026
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

May 3, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

May 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home