Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
March 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
       
नागपूर : काटोल येथील एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा नाहक बळी गेला, तर २३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेला कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील सर्व स्फोटक निर्मिती कंपन्यांचे तात्काळ ऑडिट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या आणि आक्षेप:

१) या घटनेला सर्वस्वी कंपनीचे मालक, संचालक आणि संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

२) स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना कंपनी व राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.

३) पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्था (PESO) कडे सुरक्षा देखरेखीची जबाबदारी असतानाही नागपूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत आहेत. यावरून ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून येतो, त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.

४) एसबीएल कंपनीत कामगारांना केवळ ३०० रुपये रोज देऊन त्यांच्या जिवाशी खेळ सुरू होता. या प्रकरणाची चौकशी करून कामगारांना ‘मिनिमम वेजेस’ (किमान वेतन) नुसार हक्काची मजुरी मिळावी.

५) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील स्फोटके आणि दारूगोळा बनविणाऱ्या सर्व कंपन्यांचे तातडीने ऑडिट करून सुरक्षा मानकांची खातरजमा करण्यात यावी.

निवेदन सादर करताना शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके यांच्यासह आनंद चौरे, वैभव येवले, शुभम वाहने, साधना नितनवरे, लता म्हैसकर, मनोज सुटे, तोसीब शेख, विजय गोंडुळे, पवन तागडे, किरण देवरे, कमलेश शंभरकर, शेषराव मेश्राम, ॲड. बी. पी. पानतावणे व विनोद मोहोड आदी उपस्थित होते. या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने यावेळी दिला आहे.

Tags: MaharashtranagpurNagpur newsPoliticalSblVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

Next Post

एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

Next Post
एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
बातमी

रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

by mosami kewat
August 27, 2026
0

यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक...

Read moreDetails
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

August 27, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

August 27, 2026
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

August 27, 2026
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

August 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home