Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

mosami kewat by mosami kewat
March 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय
       
मुंबई : सलग दोन दिवस हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) शंभरीच्या आत राहिल्यानंतर मुंबईतील प्रदूषणात पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रत्येकी 94 असा एक्यूआय नोंदवला गेला होता. त्यामुळे मार्चमध्ये प्रदूषणाची पातळी नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच परिस्थितीत बदल झाला आहे.

रविवारी शहराचा सरासरी एक्यूआय 118 इतका नोंदवला गेला. गेल्या चार दिवसांतील हा दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणाचे ढग दाटू लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

रविवारी हिरानंदानी गार्डन, पवई येथे 147 इतका एक्यूआय नोंदवून सर्वाधिक प्रदूषण आढळले. त्यापाठोपाठ मराठा कॉलनी, विलेपार्ले येथे 139 एक्यूआयची नोंद झाली. दुसरीकडे गावदेवी येथे सर्वात कमी 58 एक्यूआय नोंदवला गेला, तर कन्नमवार नगर 2, विक्रोळी येथे 75 इतकी पातळी होती.

दरम्यान, शहरातील तापमानही तिशीपार कायम आहे. सांताक्रूझ वेधशाळेच्या नोंदीनुसार रविवारी किमान तापमान 20 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस होते. India Meteorological Department (आयएमडी) च्या साप्ताहिक अंदाजानुसार सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकूणच, मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेले प्रदूषण आणि चढते तापमान यामुळे मुंबईकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags: MaharashtramumbaiMumbai Air PollutionVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

Next Post

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

Next Post
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

'मोदी हटाव, देश बचाव'; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत 'महाआंदोलन'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’
बातमी

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

by mosami kewat
March 2, 2026
0

मुंबई: एपस्टीन फाईल्स प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या एकतर्फी व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचे पडसाद...

Read moreDetails
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026
Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

March 1, 2026
भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

March 1, 2026
CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

March 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home