Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

mosami kewat by mosami kewat
February 28, 2026
in article, अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

       

– संजीव चांदोरकर

मराठी भाषा

कोणतीही भाषा मजबूत होणे हे काय स्वान्त सुखाय उद्दिष्ट असू शकते का ? ती भाषा बोलणारे बहुसंख्य, आणि त्यांच्या पुढील पिढ्या भौतिक, वैचारिक, भावनिक सर्वार्थाने मजबूत होणे हा त्या भाषेच्या मजबूतपणाचा एकमेव निकष मानला पाहिजे !

व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल हे फक्त इंग्रजीत
आणि कथा, कविता, कादंबऱ्या, अनेक प्रकारचे साहित्य मराठी (आणि अनेक प्रांतीय भाषेत)

हि भाषिक श्रमविभागणी कोणी केली ?

आज समाजातील १० टक्के कुटुंबांकडे अर्थव्यवस्थेतील ८० टक्के इन्कम / संपत्ती जमा होत असते. यातील अनेक कोणत्या क्षेत्रातून गडगंज पैसे कमवतात असे विचारले तर तेच उत्तर येईल : व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल इत्यादी.

म्हणजे आर्थिक / भौतिक विभागणी आणि भाषिक विभागणी यांचा काहीतरी परस्परसंबंध असला पाहिजे !

मराठी साहित्यात कथा, कांदबऱ्या, नाटके, सिनेमा यातील स्त्री, पुरुष पात्रे जगातील आणि देशातील राजकीय अर्थव्यवस्थेतील (पोलिटिकल इकॉनॉमी) बद्दल उल्लेख येत नाहीत का ? तर येतात. पण गरिबी, दारिद्र्य, विषमता याबद्दल भावनिक व्यक्त होण्यापलीकडे नाही

वाचक / प्रेक्षक याना गदगदून सोडणे एव्हढेच ; कित्ती कित्ती वाईट ना ? ह्युमन ट्रॅजेडी ना ? इतपतच. या लोकांना हे पटवून द्यायची गरज आहे की यातील अनेक प्रश्न तुमच्यावर येऊन आदळणार आहेत. तुमच्या नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या

वाचक / प्रेक्षक याना विचार प्रवृत्त करणे, काहीतरी कृती करावी, आपल्याला कृती जमत नसेल तर जे कृती करत आहेत त्यांना हर प्रकारे मदत करावी असे त्यांना वाटण्यासाठी वरील साहित्य खर्ची पडत नाही

त्यावेळी मराठी भाषा खऱ्या अर्थाने मजबूत होईल, ज्यावेळी कोट्यवधी सामान्य कष्टकरी मराठी भाषिक माणसांना , विशेषतः तरुण तरुणींना त्यांच्या भौतिक आणि आर्थिक प्रश्नांची मुळे नक्की कशात आहेत याबद्दल विचार करायला प्रवृत्त करतील, प्रश्न विचारायला लागतील

आणि कोट्यवधी सामान्य लोकांना प्रश्न पडणे, त्यांना प्रश्न विचारण्याचे धैर्य येणे हि ठोस उत्तरे मिळण्याची पूर्वअट आहे

भाषा मजबूत होणे हे काय स्वान्त सुखाय उद्दिष्ट आहे ? ती भाषा बोलणारे बहुसंख्य भौतिक, वैचारिक, भावनिक सर्वार्थाने मजबूत होणे हा भाषेच्या मजबूतपणाचा एकमेव निकष आहे

शोकांतिका हि आहे कि मराठीतील अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, सिनेमाकर आणि इतर साहित्यकार यांनी व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल हे आणि तत्सम विषय कळत्या वयापासून “ऑप्शन”ला टाकलेले असतात. ते त्याच भाषिक बायनरीचे शिकार असतात.

नव्याने लिहू लागलेल्या तरुण शब्द कर्मीकडून खूप अपेक्षा आहेत…कोणताच विषय ऑप्शनला टाकू नका मित्रानो. विशेषतः जे विषय तुमच्या, तुमच्या भावा / बहिणींच्या / कोट्यवधी नागरिकांच्या भौतिक नरक यातनांना कारणीभूत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचा सारा गेम भाषेचा / परिभाषेचा आहे. तो नेहमीच तसा राहिला आहे.


       
Tags: EconomicGloballanguageLinguistic inequalityMaharashtraMarathi languageMarathi literaturePoliticalPolitical EconomyShare market
Previous Post

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

Next Post

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

Next Post
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
बातमी

नगरसेवक शेख बिलाल यांचे निवेदन: बजेट बैठकीपूर्वी ऑडिटचा पेच, पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
April 30, 2026
0

Budget 2026 : नांदेड महानगरपालिकेच्या होणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीपूर्वी मनपाच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन 2022 ते 2025...

Read moreDetails
हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

April 28, 2026
मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचला भाऊ; १९,३०० रुपयांसाठी व्यवस्थेविरुद्ध आदिवासीचा मूक आक्रोश

April 28, 2026
टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

टाकळी प्रदे येथील घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा; आमदार मंगेश चव्हाणांची दडपशाही !

April 28, 2026
रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

रयतेच्या राजाची बदनामी कराल, तर याद राखा !

April 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home