Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
February 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा निरीक्षक दिशा पिंकी शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात बोलताना दिशा पिंकी शेख यांनी त्र्यंबकेश्वर सारख्या दुर्गम भागात पक्ष वाढीसाठी मेहनत घेणाऱ्या तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तर, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीचे त्र्यंबकेश्वर तालुक्याशी असलेले ऐतिहासिक नाते अधोरेखित केले. (Vanchit Bahujan Aghadi)

जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, प्रशिक्षण शिबिराशिवाय सक्षम कार्यकर्ते घडत नाहीत. त्यामुळे तालुक्यात कार्यकर्त्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन पक्ष संघटना अधिक बळकट करा.

या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक यांचे बंधू ऋषिकेश खाटिंगडे यांच्यासह प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नाना दोंदे यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला. (Vanchit Bahujan Aghadi)

यावेळी त्रंबकेश्वर नगरपरिषदेचे नगर सेवक यांचे बंधू ऋषिकेश खाटिंकडे व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना दोंदे, सुमित राठोड, रोशन खैरनार, ऋषी बटाव, गणेश मोंढे आदी बहुजन कार्यकर्त्यांसोबत शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, सम्यक जिल्हा अध्यक्ष मिहीर गजबे, युवा महानगर प्रमुख दीपक पगारे दिनेशदादा जाधव, जिल्हा महासचिव पंडित नेटावते जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, महेश भोसले, नाना तपासे, युवराज मणेर, मनोज उबाळे उदय गांगुर्डे, रोनक ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: AmbedkariteMovementBahujanMovementGrassrootsPoliticsLeadershipMeetmaharashtrapoliticsNashikDistrictPoliticalEventPoliticalNewsPoliticalOrganizationTribalRegionTrimbakeshwarvanchitbahujanaghadiYouthInPolitics
Previous Post

गरिबांचे मरण आणि बँकांचे ‘कमिशन’ मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

Next Post

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

Next Post
जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा
बातमी

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

by mosami kewat
August 31, 2026
0

नांदेड : ५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक २६ नुसार विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (Stenographer)...

Read moreDetails
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home