अकोला: परिस्थिती कितीही बेताची असली तरी मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर आकाशाला गवसणी घालता येते, हे अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रज्ञा पुरणमल इंगळे हिने सिद्ध केले आहे. कोणत्याही खासगी शिकवणीविना (ट्युशन) प्रज्ञाने पहिल्याच प्रयत्नात स्टाफ सिलेक्शन (SSC) परीक्षेत यश मिळवून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (ITBP) स्थान पटकावले आहे.
प्रज्ञाचे वडील पुरणमल इंगळे हे गवंडी काम आणि मिळेल ती मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर तिची आईदेखील मजुरीची कामे करते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही प्रज्ञाने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरच्या गरिबीला अडसर न ठरवता तिने स्वयंअध्ययनावर भर दिला आणि पहिल्याच प्रयत्नात ‘आयटीबीपी’मध्ये निवड होण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे, डोंगरगाव आणि परिसरातील ही पहिलीच महिला ठरली आहे जिची निवड या दलात झाली आहे. (Akola News)
वंचित बहुजन आघाडीकडून गौरव
प्रज्ञाच्या या यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिचा व तिच्या आई-वडिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी डोंगरगाव येथे जाऊन प्रज्ञाच्या जिद्दीचे कौतुक केले.
तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची ‘धडक’; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रज्ञाने मिळवलेले हे यश केवळ गावासाठीच नव्हे, तर समाजातील सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवद्गार यावेळी पदाधिकाऱ्यांनी काढले. (Akola News)
यावेळी माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य आशा इंगळे, बाबुळगाव सर्कल अध्यक्ष प्रशांत शिरसाठ, प्रदीप पळसपगार, संजय किर्तक, उमेश देवतळे यांच्यासह बबलू इंगळे, संदीप इंगळे, सुधाकर इंगळे, ऋषिकेश इंगळे, मधुकरराव इंगळे, वकीलाजी डोंगरे, अमोल गवई आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्य शासनाने लागू केलेली १ किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द...
Read moreDetails






