Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

mosami kewat by mosami kewat
February 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

मुंबई : वरळी येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८ आणि ८९ मधील रहिवाशांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रहिवाशांच्या तीव्र आंदोलनानंतर, म्हाडा प्रशासनाने नमती भूमिका घेत या दोन्ही चाळींमधील पात्र रहिवाशांचा समावेश ‘इमारत क्रमांक ६’ मध्ये करूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून बी.डी.डी. चाळ ८८ व ८९ मधील रहिवासी आपल्या हक्कासाठी म्हाडा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मूळ आराखड्यानुसार या रहिवाशांना इमारत क्रमांक ६ मध्ये स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. अनेक पक्षांनी आणि संघटनांनी यासाठी प्रयत्न केले, परंतु ठोस निर्णय होत नव्हता. अखेर हतबल रहिवाशांनी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. (Vanchit Bahujan Aghadi)

ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने म्हाडा मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाची तीव्रता पाहता, बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रहिवाशांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. (Vanchit Bahujan Aghadi)

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर, जैस्वाल यांनी रहिवाशांची मागणी तत्काळ मान्य केली. २७ जानेवारी रोजी रद्द झालेली लॉटरी आता सुधारित पद्धतीने, म्हणजेच चाळ क्रमांक ८८ व ८९ चा समावेश करूनच काढली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Vanchit Bahujan Aghadi)

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, उपाध्यक्ष राकेश कांबळे, आकाश दोडके, समीर कांबळे, संतोष आंबुलगे, सतीश राजगुरू, मिलिंद जाधव, अशोक गुजेट्टी, मनोज मर्चंडे, राजेंद्र बडेकर, राज सावंत, विक्रांत गमरे, आदेश साळवी, विक्रांत कांबळे आणि निर्भय माने यांसह मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते.

Tags: BalasahebAmbedkarBDDChawlRedevelopmentHousingRightsMaharashtraNewsMHADAMumbaiHousingMumbaiNewsPeoplePowerProtestSuccessRedevelopmentUpdateResidentsProtestSocialJusticeUrbanDevelopmentWorliBDDChawl
Previous Post

अकोला: संत गाडगेबाबा जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी

Next Post

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

Next Post
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home