Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
एपस्टीन फाईल’ प्रकरण – ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत होणार निदर्शने!
       
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एपस्टीन फाईलमधील  उल्लेखावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ), मुंबई समोर भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरून केली आहे.

काल शुक्रवारी (दि. २०) मुंबईत विविध सामाजिक संघटनांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये एपस्टीन या फाईलमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने एक ईमेल असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच अमेरिका-भारत व्यापारी करारामुळे भारत अमेरिकेचा गुलाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या जुन्या वादांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. (Prakash ambedkar)

‘एपस्टीन फाईल’ आणि गंभीर आरोप :

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एपस्टीन फाईलमध्ये जेफ्री एपस्टीनने मोदींना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी इस्रायल दौऱ्यात ‘नाच-गाणे’ करण्याचा सल्ला दिला होता. त्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी नाचगाणे केल्याचा उल्लेख इमेल मध्ये आलाय. यावरून त्यांनी पंतप्रधानांवर टीका करत, केंद्र सरकारने देशाला गहाण ठेवल्याचा आरोप केला आहे. (Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेसोबत झालेला करार केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित नसून, भारताची विदेश नीती, अर्थ नीती आणि आरोग्य नीती आता अमेरिका ठरवणार आहे. पंतप्रधानांनी देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधले आहे, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. हा देश विकण्यापासून वाचवण्यासाठी २ मार्च रोजी होणाऱ्या निदर्शनांत तमाम जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दरम्यान, एपस्टीन फाइलमध्ये नरेंद्र मोदीचे नाव आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Tags: americaDonald TrumpEpstein FilesGlobalindiaMaharashtramumbaipmPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

Next Post

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home