Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

mosami kewat by mosami kewat
February 13, 2026
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार
       
अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय चौरपगार यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अमरावती विभागीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.

धम्म तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर विभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अकोल्यातील या बैठकीत अमरावती विभागातील जिल्हानिहाय संस्कार, संरक्षण, प्रचार-प्रसार आणि पर्यटन या विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. (Akola news)

याप्रसंगी मान्यवरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या आगामी उपक्रमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये या सभेत समाजातील जनजागृतीसाठी विविध शिबिरे राबवणे, ऐतिहासिक बुद्ध स्थळांच्या सहलींचे आयोजन करणे, ‘गाव तेथे भारतीय बौद्ध महासभा’ आणि ‘समता सैनिक दल’ स्थापन करणे आदी विषयांवर भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे संस्कार विभाग प्रमुख विजय कांबळे यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य संरक्षण उपाध्यक्ष व्ही.डी. हिवराळे, संस्कार विभाग सचिव रविंद्र गवई, राज्य संघटक भिमराव तायडे, जिल्ह्याचे अध्यक्ष पी.जे. वानखडे सर, सरचिटणीस नंदकुमार डोंगरे आणि कोषाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनीही उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Akola news)

या सभेला अमरावती (पूर्व/पश्चिम), अकोला, बुलढाणा (उत्तर/दक्षिण), यवतमाळ (पूर्व/पश्चिम), वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे यांनी केले, तर प्रास्ताविक भीमराव तायडे यांनी मांडले. उपस्थितांचे आभार प्रकाश बोरकर यांनी मानले. 

Tags: AkolabuddhismBuddhistMaharashtraprogramअमरावतीभारतीय बौद्ध महासभा
Previous Post

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

Next Post

मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post
मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
बातमी

मुंबई : गोरेगावमधील ४५ मजली इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

by mosami kewat
February 13, 2026
0

मुंबई: मुंबईच्या उपनगरातील गोरेगाव परिसरात एका ४५ मजली इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सकाळी 9.11 वाजता...

Read moreDetails
अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

February 13, 2026
ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

ओडिशात सामाजिक विषमतेचा कळस: दलित स्वयंपाकीची नियुक्ती केल्याने पालकांचा अंगणवाडीवर बहिष्कार

February 12, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत दिनेश जाधव यांचा असंख्य समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश

February 12, 2026
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

February 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home