अमरावती: रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीत अधिकृतरीत्या प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रिद्धपूर सर्कल मधील नामवंत सामाजिक कार्यकर्ते दिनेश वानखडे, सतिष बंग आणि नरेंद्र खराते यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचितचा झेंडा हाती घेतला. वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या हस्ते या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी विलासराव वानखडे (जिल्हा उपाध्यक्ष तथा रिद्धपूर उपसरपंच), सागर भवते (युवा आघाडी जिल्हा महासचिव), अमोल सरवटकर, दिनेश इंगळे, आदर्श शेंडे, अमोल जवंजाळ (तिवसा तालुका महासचिव), शैलेश बागडे, संदेश ढोके तसेच आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






