Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

mosami kewat by mosami kewat
February 11, 2026
in article
0
वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !
       

– आकाश मनिषा संतराम

मोहन भागवत सध्या ज्या तडफेने माध्यमांसमोर येत आहेत, ते पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघाला आता स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. ही वेळ संघावर कधीच आली नव्हती. कारण संघ नेहमी प्रश्न विचारणारा राहिला, उत्तर देणारा नाही. पण औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनआक्रोश मोर्च्याने हे चित्र उलटं केलं. मोर्च्यात विचारलेला प्रश्न फार मोठा नव्हता. संघाची भारतीय कायद्यानुसार नोंदणी आहे का? असेल तर दाखवा. नसेल तर करा. एवढंच. पण हाच प्रश्न संघाला अस्वस्थ करून गेला. कारण हा सवाल विचारसरणीवर नव्हता, तर अस्तित्वाच्या वैधानिकतेवर होता.

याच प्रश्नानंतर मोहन भागवत संघाची निवड प्रक्रिया सांगू लागले. जात महत्त्वाची नाही म्हणू लागले. संघ कोणाच्याही विरोधात नाही म्हणू लागले. प्रचार नाही, संस्कार आहेत म्हणू लागले. इंग्रजीबाबत भूमिका स्पष्ट करू लागले. भ्रष्टाचाराविरोधात भूमिका सांगू लागले. म्हणजे एकदम सर्व बाजूंनी सफाई सुरू झाली. पण समाज इतका भोळा नाही. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सरळ प्रश्न विचारला आहे. गोलवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये मांडलेला सांस्कृतिक आराखडा मोहन भागवत मान्य करतात का? हा प्रश्न संघाच्या मुळावर आहे. कारण आज भागवत समावेशकतेची भाषा बोलतात. जर ती खरी असेल, तर जुने विचार चुकीचे होते, हे सांगावं लागेल. आणि जुने विचार योग्य असतील, तर आजची भाषा ही फक्त परिस्थितीनुसार घेतलेली सोय आहे, हे मान्य करावं लागेल.

एकेकाळी कलाकार, चित्रपट, आधुनिक संस्कृती यांची टिंगल करणारी विचारधारा आज त्याच कलाकारांसमोर जाऊन संवाद साधते. पूर्वी ज्यांना हिणवलं, त्यांच्याच प्रसिद्धीचा वापर आज प्रतिमा उभारण्यासाठी केला जातो. हा बदल विचारांचा नाही, तर गरजेचा आहे, हे लोक ओळखत आहेत. भागवत जातनिरपेक्षतेची भाषा बोलतात. पण त्याच वेळी संघाची सुरुवात ब्राह्मणबहुल समाजातून झाली, ही कबुली देतात. मग प्रश्न असा उभा राहतो की इतिहास बदलला आहे का, की फक्त शब्द बदलले आहेत? सुजात आंबेडकरांच्या मोर्च्याने हेच प्रश्न रस्त्यावर आणले. घोषणांपेक्षा कायद्याचा मुद्दा पुढे ठेवला. संविधानाच्या चौकटीत लढा देण्याची शपथ घेतली. ही एक जबाबदारी होती आणि म्हणूनच त्याचा परिणाम झाला.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सावरकर, हिंदू महासभा, पत्री सरकार, ओबीसी हक्क, यूजीसी नियमावली या सगळ्या संदर्भांनी संघाला इतिहासासमोर उभं केलं. आणि इथेच संघ अडखळतो. संघ प्रचार करत नाही, संस्कार करतो असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात संघ प्रत्येक क्षेत्रात पोहोचलेला दिसतो. जनसंपर्क मोहिमा वाढतात. प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न वाढतात. वाणी एक आणि करणी एक, हे लोकांच्या लक्षात येत आहे.

संघ कोणालाही लक्ष्य करत नाही असं सांगितलं जातं. पण सामाजिक वास्तवात संघाची ओळख एका ठराविक विचारसरणीशी घट्ट जोडलेली आहे. ती ओळख शब्दांनी नाही, वर्तनाने बदलावी लागते. हाच आग्रह वंचित बहुजन आघाडी धरून आहे. आज परिस्थिती अशी आहे की संघाला स्वतःच्या भूतकाळाकडे आणि वर्तमानाकडे एकाच वेळी बघावं लागत आहे. एका बाजूला समावेशकतेची भाषा. दुसऱ्या बाजूला इतिहासातील कठोर भूमिका. एका बाजूला जातनिरपेक्षतेचा दावा. दुसऱ्या बाजूला सामाजिक वास्तव.

वंचित बहुजन आघाडीने जे प्रश्न विचारले, ते समाजाच्या मनात आधीपासून होते. सुजात आंबेडकरांनी त्यांना आवाज दिला. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना विचारांची धार दिली. आणि म्हणूनच आज संघाला वारंवार बोलावं लागत आहे. मोहन भागवत शांत भाषेत बोलतात. पण त्या शांत भाषेमागे उभे असलेले प्रश्न फार अस्वस्थ करणारे आहेत. समाज आता शब्दांवर नाही, तर वास्तवावर विश्वास ठेवतो आहे आणि म्हणूनच आज संघाच्या बोलण्यात आणि वागण्यात असलेली तफावत उघडपणे दिसू लागली आहे.


       
Tags: Mohan BhagwatPrakash AmbedkarrssRSS MurdabadSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Next Post
मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?
बातमी

‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?

by Akash Shelar
June 16, 2026
0

मुंबई : अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ आता एका मोठ्या वास्तवाच्या रूपाने समोर आली...

Read moreDetails
घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा

घरपट्टी वाढ रद्द करा; अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा – वंचित बहुजन कामगार युनियनचा इशारा

June 15, 2026
वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

June 15, 2026
जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश

June 15, 2026
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

June 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home