पुणे : विश्रांतवाडी येथील रहिवासी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ओव्हाळ परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून वैचारिक चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकास ५ हजार रुपयांचे धम्मदान करण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापक विलास टेकाळे आणि अनिता टेकाळे यांनी रविंद्र गोविंद ओव्हाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व भारतीय संविधानाची प्रत व ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन’ हे पुस्तक भेट देऊन ओव्हाळ परिवाराच्या या सामाजिक व वैचारिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. (Prabuddha bharat ceremony)
“समाजात वैचारिक प्रबोधन करणाऱ्या व समाजाला दिशा देणाऱ्या संस्थांना, माध्यमांना पाठबळ देणे ही आजच्या काळाची गरज आहे,” अशी भावना यावेळी रविंद्र ओव्हाळ यांनी व्यक्त केली. (Prabuddha bharat ceremony)
बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक प्रबुद्ध भारत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत हे बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक आहे. प्रबुद्ध भारतच्या व्यवस्थापनाने रविंद्र ओव्हाळ यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.






