Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
       
देवणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोरोळ (ता. देवणी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा प्रचंड उत्साहात पार पडली.

या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. (Anjali ambedkar election campaign)

सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलेली चळवळ आहे. ग्रामीण भागातील विकास आजही दुर्लक्षित आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांअभावी जनता त्रस्त आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था दाखवून देत त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर दिला. जिल्हा परिषदेच्या शाळांचे सक्षमीकरण करून विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. शिक्षण हा विकासाचा पाया असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. (Anjali ambedkar election campaign)

तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते आणि सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परिवर्तनासाठी मतदानाचे आवाहन

स्थानिक विकासातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. त्यांच्या भाषणाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सभास्थळी कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या जाहीर सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमोल लांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, सुजाता अजनिकर यांच्यासह पक्षाचे जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Tags: Anjali AmbedkarElectionElection campaignElection newslaturMaharashtraPoliticalpolticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post

आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!

Next Post
आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!

आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home