Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गावखेड्यांत रस्ते, पाणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी ‘वंचित’ कटिबद्ध – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       
शिरूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची जाहीर सभा आज शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक प्रश्नांवर बोट ठेवत विकासाचा मुद्दा मांडला. (Anjali ambedkar)

सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढत आहे. त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्द्यांवर भर दिला –

-गावखेड्यांत दर्जेदार रस्ते आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार.

– ग्रामीण भागातील जनतेला शहरात न धावता गावातच सर्वोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.

– जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था थांबवून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात जोपर्यंत वंचित समाजघटकांचे प्रतिनिधी पोहोचत नाहीत, तोपर्यंत सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे विकासाची नवी पहाट पाहण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तसेच या जाहीर सभेला कांबळगा आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (Anjali ambedkar)

व्यासपीठावर वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमोल लांडगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, सुजाता अजनिकर यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सभेमुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags: Anjali ambedkar LaturElectionElection campaignlaturLocal body electionMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘मनरेगा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात एल्गार; शासन सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी

Next Post

विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
बातमी

वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 15, 2026
0

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी...

Read moreDetails
प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामसभा बोलावल्याचा आरोप; माहुली जहागीर पोलिसांना ‘वंचित’चा इशारा

September 15, 2026
चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला बळ; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

September 15, 2026
हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

हवामान मोजणारी यंत्रणाच बंद असताना ५५० कोटी खर्चाचा घाट नक्की कुणासाठी ?

September 15, 2026
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home