औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक २४ (संजय नगर-मुकुंदवाडी) मध्ये वंचित बहुजन आघाडीचे सतीश गायकवाड हे तगडे उमेदवार आहेत. त्यांना मतदारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. अश्यात मतदानाच्या काही काळ आधीच या भागात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘पैसा’ या अस्त्राचा वापर सुरू केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे.
सतीश गायकवाड यांच्या वाढत्या लोकप्रियतेने भाजप धास्तावली?
प्रभाग क्रमांक २४ मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांना मतदारांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या रॅली आणि त्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. गायकवाड हे या प्रभागातून ‘तगडे उमेदवार’ म्हणून समोर आहेत. दरम्यान भाजपने आता साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब सुरू केल्याचे बोलले जात आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/r/1CBXDiubwM/
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश गायकवाड यांना मिळणारा जनपाठिंबा पाहून भाजपने आपला ‘अंतिम पर्याय’ निवडला आहे. काल रात्री संजय नगर आणि मुकुंदवाडी परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या अंधारात घरोघरी जाऊन प्रति मत २००० रुपये वाटल्याची धक्कादायक समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून भाजप पक्षावर टीका करण्यात येत आहे.
सतीश गायकवाड यांच्यासारख्या जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला रोखण्यासाठी भाजपकडून हा खालच्या पातळीचा मार्ग अवलंबला जात असल्याचा संताप वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. “जनतेचा कौल पैशांनी विकत घेता येत नाही,” अशी भावना सुज्ञ मतदारांमधून उमटत आहे.






