अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची अकोट फाईल परिसरात जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

सभेत बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. अकोला शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून गटार व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारण्यावर वंचित बहुजन आघाडी भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता परिवर्तनाची गरज आहे. शहरवासीयांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना द्यावी आणि त्यांना मतदान करून विजयी करावे,” असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केले.
या सभेमुळे अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. या जाहीर सभेत अकोलाकरांची मोठी गर्दी जमली होत.






