Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
January 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन
       

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची न्यू तापडिया नगर, मुख्य रोड, अकोला येथे जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी देण्याचे आवाहन केले. अकोला शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ठोस नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक प्रशासनाची गरज आहे. शहरातील गटार व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या आरोग्य सुविधा तसेच महानगरपालिकेच्या शाळांचा खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या.

शहरातील सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे सक्षम आणि प्रामाणिक प्रतिनिधी निवडून दिल्यास शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल. भ्रष्टाचारमुक्त कारभार, दर्जेदार नागरी सुविधा आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर तसेच ज्ञानेश्वर सुलताने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही अकोला शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठी बाजी मारण्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. 


       
Tags: AkolaAkola municipal corporation electionAnjali AmbedkarElectionElection campaignElection newsMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

Next Post

सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

Next Post
सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील ‘कॉर्नर’ सभेत जनसागर लोटला

सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; ऐरोलीतील 'कॉर्नर' सभेत जनसागर लोटला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home