मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. वॉर्ड क्रमांक १३९ मधून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय लढत चुरशीची होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्नेहल सोहनी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभागातील गणिते बदलणार?
वंचित आणि काँग्रेसच्या युतीने मुंबईत अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर भर देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले.





