मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीने आज आपले अधिकृत उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. ही युती मुंबईतील समीकरणे बदलणार असून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

वार्ड क्र. 98 सुदर्शन पिठाजी येलवे, वार्ड क्र. 146 सतीश वामन राजगुरू, वार्ड क्र. 169 स्वप्नील राजेंद्र जवळगेकर, तसेच वार्ड क्र. 155 ज्योती स्वप्नील वाघमारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुंबई महानगरपालिकेत प्रस्थापित राजकारणाला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. आज अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात जनसंपर्क आणि विकासाच्या मुद्द्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

या उमेदवारांनी स्थानिक विकास, नागरिकांची सुविधा आणि सामाजिक न्याय यावर आपली लक्ष केंद्रित करून प्रचार अभियान सुरू करण्याची तयारी केली आहे.






