औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपली ताकद आजमावत तरुणांना मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

याच धोरणाचा भाग म्हणून आज विविध प्रभागांमधून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवकांना 50% उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेववाऱ्यांची नवे पुढीलप्रमाणे –
- प्रभाग 1 क, गौरी प्रभाकर बकले
- प्रभाग 17 ड, आशुतोष सिद्धार्थ नरवडे
- प्रभाग 19 अ, रोहित प्रकाश साळवे
- प्रभाग 19 ड, राहुल मकासरे’

वंचित’चा युवकांवर भरवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत युवा उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे.






