नांदेड : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या (२०२६) रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) मोठी भरारी घेतली आहे. प्रस्थापित पक्षांची अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, वंचित बहुजन आघाडीने नांदेड महानगरपालिकेसाठी आपली उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी निश्चित करण्यात आली असून, यामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि स्थानिक चेहऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवारांच्या घोषणेमुळे इतर राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली असून, वंचितने प्रचारात आघाडी घेतली आहे. नांदेड महानगरपालिका निवडणूकसाठी वंचित बहुजन आघाडीने ९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. ती नावे पुढीलप्रमाणे आहेत –
– विशाखा साहेबराव पंडित, प्रभाग 03 अ, आरक्षण अ. जा. (महिला)
– विजय ज्ञानदेव चौधरी, प्रभाग 03 ब, आरक्षण इ.मा.प्र
– सलमा बेगम मोईन शेख, प्रभाग 03 क, आरक्षण सर्वसाधारण (महिला)
– राहुल अनंतराव पवार, प्रभाग 03 ड, आरक्षण सर्वसाधारण
– दीपमाला विठ्ठल गायकवाड, प्रभाग 20 अ, आरक्षण अ.जा. (महिला)
– सिमरन कौर गोपाल सिंग टाक, प्रभाग 20 आरक्षण ब, इ.मा.प्र
– अमृत दशरथराव नरंगलकर, प्रभाग 20 इ, आरक्षण सर्वसाधारण
– महेश नारायणराव नीलकंठवार, प्रभाग 20 क, आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग
-शितल यशवंत आवाळे, प्रभाग 20 ड, आरक्षण सर्वसाधारण





