औरंगाबाद : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर शहरात ‘वंचित’चा दबदबा पाहायला मिळत आहे.

याच प्रभावामुळे मनसेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांची साथ सोडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन युवा आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
नगरपरिषद निवडणुकीतील विजयाने वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. “वंचितची विचारधारा आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्वच सामान्यांना न्याय देऊ शकते,” असा विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी ‘निळा झेंडा’ हाती घेतला आहे.
प्रवेश सोहळा आणि प्रमुख उपस्थिती
शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य कार्यालयात अत्यंत उत्साहात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि युवा आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नवागतांचे स्वागत केले.

यावेळी अमोल विधाते (शहर संघटक), अमोल विधाते (विभाग अध्यक्ष), नवनाथ हटकर (उपविभाग अध्यक्ष), प्रथमेश घाटबाळे (शाखा अध्यक्ष), करण विधाते, विशाल येडकर, प्रशांत राजपूत, प्रेम पोटफोडे, सुनील भिसे, सचिन महापुरे, विशाल राजपुत व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबादमधील प्रवेशामुळे वंचित बहुजन युवा आघाडीची ताकद शहरात दुप्पट झाली असून आगामी निवडणुकांमध्ये वंचित बाजी मारणार असल्याचे म्हटले जात आहे.






