अहमदनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवा कार्यकर्ते योगेश शांतीलाल क्षीरसागर यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
केडगाव येथे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष हनीफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाध्यक्ष साठे यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा हाती घेऊन या युवा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला शहर आणि जिल्ह्यात मोठे बळ मिळणार असून, आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढणार आहे.
जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पक्षाच्या प्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांवर लवकरच योग्य आणि मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.
योगेश क्षीरसागर यांच्यासह प्रदीप दातिर, सुशील जगधने, स्वप्नील जगधने, किरण काळोखे, अजय सोनवणे, उमेश कसपटे, सागर कसपटे, समीर आल्हाट, उजागरे यांसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रवीण ओरे, जीवन कांबळे, फैरोज पठाण यांसह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.






