जालना : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदनामीकारक आणि जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या व्हिडिओविरोधात वंचित बहुजन आघाडी जालना, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी औरंगाबाद येथे RSS कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या जनआंदोलन मोर्च्यानंतर करण्यात आलेल्या सोशल मीडियावरील पोस्टच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तातडीने आरोपींवर कारवाई करण्यात यावी.
या वेळी जालना पश्चिम जिल्हा अध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे, महिला जिल्हाध्यक्षा सौ रमा होरशिळी,जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, जिल्हा महासचिव प्रशांत कजबे,जालना तालुका उपाध्यक्ष विलास नरवाडे, जालना तालुका सचिव गौतम वाघमारे संजय आदमाने, अमोल साळवे,अमोल लोखंडे,युवा जिल्हा उपाध्यक्ष हरिष रत्नपारखे, बदनापुर तालुका उपाध्यक्ष मुरलीधर बोबडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






