पुणे : महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) कथित भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यात विराट धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पुणे एसआरए कार्यालयावर धडकणार आहे.
महायुती सरकार आणि एसआरएच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेत हा मोर्चा वेळात कृषी महाविद्यालय (शिवाजीनगर) ला पोचला आहे.
मयुरी बगाटे यांच्या निधनामुळे परभणी शहरावर शोककळा; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली बगाटे परिवाराची भेट
माणुसकीचे दर्शन:
दरम्यान, या विराट मोर्चा दरम्यान शिस्त आणि माणुसकीचे दर्शन घडले. मोर्चातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेसाठी त्वरित रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास कोणताही अडथळा आला नाही, या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एसआरएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कथित गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा ‘विराट धडक मोर्चा’ काढण्यात येत आहे.






