परभणी : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय बगाटे यांच्या कन्या मयुरी बगाटे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या घटनेमुळे परभणी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, बगाटे परिवारावर शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर बगाटे परिवाराची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा परभणी जिल्हा समन्वयक अशोक भाऊ सोनोने, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे गुरुजी, विभागीय प्रशिक्षक प्रा. सुरेश शेळके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोद कुटे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) मनोहर वावळे, महानगर अध्यक्ष मुद्दसीर असरार, तसेच एन.जी. खंदारे यांनी सांत्वनपर भेट देऊन बगाटे परिवाराला धीर दिला.
या प्रसंगी मान्यवरांनी बगाटे परिवाराला या दु:खातून सावरण्याची मानसिक शक्ती आणि धैर्य लाभो, अशी मनःपूर्वक भावना व्यक्त केली. तसेच मयुरी बगाटे यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.






