औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक औरंगाबाद येथे पार पडली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. या बैठकीत आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
यावेळी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाचे निमंत्रक प्रा. किसन चव्हाण, धनगर नेते प्रभाकर बलके, ओबीसी नेते अशोक जाधव धनगावकर, महेश निनाळे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते.