औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वंचित बहुजन युवा आघाडीने (VBA) सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, प्रभाग क्रमांक ५ : आदर्श नगर (गुलाबवाडी) येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी किरण सरवदे यांची या शाखेच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता वंचित बहुजन युवा आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या शाखेचे उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाला जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहर उपाध्यक्ष दिनेश नवगिरे, आशुतोष नरवडे, कुणाल गायकवाड, रवींद्र गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, आणि जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवक आघाडीचे मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्या मार्फत करण्यात आले होते.