नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यास शहर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांनी उपस्थित राहून मोठी गर्दी केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी भाषणातून कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याची दिशा आणि आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
मेळाव्यात विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. कामगारांच्या न्याय, सन्मान आणि सामाजिक सुरक्षेच्या मागण्यांवर ठोस भूमिका मांडण्यात आली.
या मेळाव्यामुळे नवी मुंबई परिसरातील कामगारांमध्ये नवचैतन्य आणि एकजुटीची भावना निर्माण झाली असून, पुढील काळात हक्कांसाठी लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.