Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

mosami kewat by mosami kewat
October 6, 2025
in बातमी, सामाजिक
0
Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया
       
उत्तर प्रदेश : रायबरेली येथील ऊंचाहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून हरिओम नावाच्या एका दलित युवकाला जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ॲड. प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया :

या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल X वर ट्विट केले आहे की, “त्याचा ‘गुन्हा’ हा नव्हता की त्याला चोर समजण्यात आले होते. त्याचा गुन्हा एवढाच होता की तो दलित होता! न्याय मिळाला पाहिजे!” ॲड. आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन हरिओम याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊंचाहार येथे हरिओम या दलित तरुणाला चोर समजून काही लोकांनी पकडले आणि त्याला क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पोलिसांनी या घटनेची घेतली असून, एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

तसेच या गंभीर घटनेत हलगर्जीपणा केल्यामुळे ऊंचाहार पोलीस स्टेशनच्या प्रभाऱ्यासह (कोतवाल) चार अन्य पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्य आणि नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags: CastcrimeDalit Youth LynchedJusticepolicepoliticsRaebareliUttar PradeshVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

देशात टोकाची आर्थिक विषमता तयार झाली की हुकूमशहा का जन्माला येत असतील ? परस्परांचा काय संबंध ? : अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केस स्टडी.

Next Post

जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: ‘जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!’ – ॲड प्रकाश आंबेडकर

Next Post
जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: 'जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!' - ॲड प्रकाश आंबेडकर

जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: 'जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!' - ॲड प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !
article

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

by mosami kewat
February 11, 2026
0

- आकाश मनिषा संतराम मोहन भागवत सध्या ज्या तडफेने माध्यमांसमोर येत आहेत, ते पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघाला...

Read moreDetails
बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बहादुरा प्रशासनाचा बेजबाबदारपणा; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

February 10, 2026
‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

‘मोदींचे कोणते काळे गुपित ट्रम्प यांच्याकडे?’ प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल!

February 10, 2026
शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा!

शेगाव तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा; पंधरा दिवसांत कारवाई करा, अन्यथा ‘वंचित’चा आंदोलनाचा इशारा!

February 10, 2026
नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

नांदुरा तालुक्यातील फुली येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखा फलकाचे थाटात उद्घाटन

February 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home