Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात परभणीत ‘जोडे मारो’ आंदोलन; वंचित बहुजन युवक आघाडीचा तीव्र निषेध

mosami kewat by mosami kewat
October 6, 2025
in बातमी, राजकीय
0
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात परभणीत 'जोडे मारो' आंदोलन; वंचित बहुजन युवक आघाडीचा तीव्र निषेध

बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात परभणीत 'जोडे मारो' आंदोलन; वंचित बहुजन युवक आघाडीचा तीव्र निषेध

परभणी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन युवक आघाडीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
‎
‎या निषेधार्थ वंचित बहुजन युवक आघाडी, जिल्हा परभणी यांच्या वतीने परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर संतप्त ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक छायाचित्राला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला. (vanchit bahujan aghadi)
‎
‎आंदोलनाचे नेतृत्व
‎
‎हे आंदोलन वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष गणेश गाढे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी बोलताना गाढे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले, अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे देशातील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरलेल्या काही नेत्यांकडून खालच्या दर्जाची वक्तव्ये करण्यात येत आहेत. आम्ही अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो आणि समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. (vanchit bahujan aghadi)
‎
‎कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
‎
‎या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, समाजाच्या हक्कांसाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार केला.

Tags: MaharashtraparbhaniPrakash AmbedkarProtestssanjay rautShivsenaUddhav ThackerayVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

Mumbai : कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या निषेधानंतर BMC प्रशासनाची दखल; दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

Next Post

नाशिकमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post
नाशिकमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

नाशिकमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home