अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याच्या व्यासपीठावर अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोला येथे हा भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन झाले.