पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये उत्साहाने प्रवेश केला. भीम ज्ञान प्रसारक संघ बुद्ध विहार, जय भवानी नगर, कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीला मोठी ताकद मिळाली आहे.
या कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश –
या सोहळ्यात अनिकेत सोनवणे, आदिनाथ ढगे, उत्तरेश्वर सरवदे, चंद्रकांत रतन कांबळे, राहुल रतन बनसोडे, दत्तात्रय सिताराम चांदगुडे, विनोद उबाळे, ज्ञानोबा विश्वंभर मुंडे, विशाल अरकडे, रोहित संजय शिंदे, सुरेश अंबादास लोंढे, सुमित सुरेश लोंढे, किरण सुरेश लोंढे, दीपक चंद्रकांत कांबळे, दीपक धडे, सुरज हजारे, शेखर भालेराव यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे सदस्यत्व स्वीकारले. हा कार्यक्रम विशाल सरोदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
नवीन प्रवेश केलेल्या युवा कार्यकर्त्यांचे स्वागत पुणे शहर वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये पुणे अध्यक्ष सागर नामदेव आल्हाट, उपाध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यकारी सदस्य अरुणदादा इंगळे, सचिव विपुल सोनवणे, सचिव किरण सैंदाणे, संघटक धनंजय गायकवाड, राजरत्न गाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख संदिप चौधरी आणि राहूल दहिरे यांचा समावेश होता.