बीड : यश ढाका खून प्रकरण अधिक गहिरं होत चाललं असून, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.
सुजात आंबेडकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यात त्यांनी पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
यश ढाका याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला असून, त्या व्हिडिओतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. याशिवाय, पवार आणि बल्लाळ या दोन पोलिसांनी ढाका कुटुंबियांना धमकावल्याचा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
या सर्व घडामोडींमुळे यश ढाका प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी कुटुंबीय आणि वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभ्या आहेत. प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी होत आहे.