बीड – वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी यश देवेंद्र ढाका यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट घेतली.
शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात यश ढाका (वय 22) या तरुणाची क्षुल्लक कारणावरून दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता हत्या करण्यात आली होती. माने कॉम्प्लेक्स भागात गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर सहा ते आठ जणांनी यश ढाका याच्या पोटात चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती.
या भेटी वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण आबा जाधव, जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, सचिन मेघडंबर, पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे प्रमुख अमरसिंह ढाका, समता सैनिक दलाचे कॅप्टन राजाभाऊ आठवले, आम्रपाली साबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित नेत्यांनी स्व. यश देवेंद्र ढाका यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला, त्यांच्या दुःखात सहभागी झाले आणि कुटुंबियांसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले.