सोलापूर : माढा तालुक्यातील उंदरगाव गावात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी बांधवांनी त्यांच्या व्यथा व अडचणी मांडल्या.
उंदरगाव गावातील शेतकरी अवकाळी पाऊस, पाण्याची टंचाई व पिकांचे मोठे नुकसान, शेतचारा यामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता असल्याचे सांगत तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.
प्रशासनाशी संपर्क साधून ग्रामस्थांना तातडीने मदत करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड राहुल चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, विशाल नवगिरे इत्यादी उपस्थित.