भिवंडी : भिवंडीच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणारी घटना पाहायला मिळाली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या भिवंडी शहर महिला अध्यक्षा शमा परविन मोईन शेख यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर, भीम आर्मीचे भिवंडी शहराध्यक्ष सुरज जाटव यांनीही अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे भिवंडी शहरातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या सोहळ्याला सम्यक विद्यार्थी आंदोलनचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता रुपेश हुंबरे, वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहराध्यक्ष प्रदीप शिर्के, आकाश गायकवाड व उमेश घोडके, अंकुश बचुटे, डी.एस. गायकवाड, संगम पाडा शाखा उपाध्यक्ष निलेश घाडगे, विकी घाडगे व समीर शेख यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.