Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भारतीय रेल्वेचे 70 टक्के खासगीकरण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : करण गायकर यांच्या प्रचारार्थ सभा

इगतपुरी : भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे म्हणून सांगा. २०१४ ला भारतीय रेल्वे १०० % सरकारची आणि भारतीयांची होती. २०२४ मध्ये निवडणुका होत आहेत, या दहा वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेचे ७०% खासगीकरण झाले आहे, ३०% च सरकारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचार सभेत केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी घटना बदलू शकत नाहीत. बाबासाहेब 1956 साली आमच्यातून निघून गेले. अजूनपर्यंत चमत्कार झालेला नाही की, गेलेला माणूस परत येतो. त्यामुळे बाबासाहेब परत येणार नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नका, मोदी तुम्ही सांगा की, तुम्ही घटना बदलणार आहे की नाही याचा खुलासा करा.

बांधवांनो, तो खुलासा झाला नाही तर लक्षात ठेवा हे भाजपा-आरएसएस घटना बदलणार आहेत.

150 वर्षांनंतर सुद्धा महात्मा फुले यांच्याबद्दल अपशब्द का बोलले जातात ? तर या देशाच्या विषमतावादी सामाजिक व्यवस्थेला महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरुंग लावला हे लक्षात घ्या. त्यांनी फक्त नुसता सामाजिक बदल केला नाही, तर इथल्या शेतकऱ्यांना जागृत करण्याचे कार्य सुद्धा केले आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की, सरकारने जो इलेक्ट्रोल बाँड काढला आणि त्याच्यातून वीस हजार कोटी जमवले ही पद्धत घटनाबाह्य आहे. गावातील दादा जसा दुकानदाराकडून वसूली करतो. तशाच पद्धतीने यांनी सुद्धा वसुली केल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राजकीय सार्वभौम टिकवून ठेवायचे असेल, तर आर्थिक कणा मजबूत असायला पाहिजे. आर्थिक कणाच कमकुवत असेल, तर आपल्याला नांगी टाकावी लागत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.


       
Tags: LoksabhanashikPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

Next Post

तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

Next Post
तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर
बातमी

इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर

by mosami kewat
November 25, 2025
0

युवा नेते सुजात आंबेडकरांचे RSS ला थेट आव्हान! मुंबई : वंचित बहुजन आघाडीने (VBA) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails
मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

November 25, 2025
मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

मुंबईत वंचितच्या ‘संविधान सन्मान महासभे’ची जय्यत तयारी; युवा नेते सुजात आंबेडकरांकडून तयारीचा आढावा

November 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home