Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल
       
पुणे : भोर येथील 19 वर्षीय बौद्ध तरुण मयूर खुंटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून भोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम 118(1) (मारहाण) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पीडित कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत सांत्वन केले.

कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रकरणाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पक्ष स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात्मक भूमिकेत पुढे आले असून या प्रकरणाला गती मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कुटुंबीयांना भेट देऊन न्यायासाठी एकसंघ राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे, सातारा जिल्हा अध्यक्ष रामदास कांबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर गायकवाड, पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष मिलींद जगताप, प्रमोद भालेराव, अमर माने, विशाल शाक्य, डॉ. राजेश धिवार, महेंद्र सपकाळ, प्रकाश ओव्हाळ, अक्षय गायकवाड, सागर यादव, विनोद गायकवाड, बी. पी. सावळे, अरविंद कांबळे, प्रवीण बागुल, अमर शिंदे, प्रफुल जाधव, संदीप जाधव, सतीश गायकवाड, संतोष तांबे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags: MaharashtrapoliticsPrabuddh BharatPrakash AmbedkarpunePune NewsSucideVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अकोटमध्ये अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा गाजली; विकासासाठी वंचित आघाडीला पाठिंब्याची गर्दी

Next Post

वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!

Next Post
वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!

वाशिममध्ये सुजात आंबेडकरांची जाहीर सभा: मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सत्ता परिवर्तनाची हाक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित
Uncategorized

बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित

by mosami kewat
December 19, 2025
0

ढाका : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत रौद्र आणि हिंसक रूप धारण केले आहे. आंदोलकांनी गुरुवारी राजधानी...

Read moreDetails
मालेगावात ‘वंचित’चा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा!

मालेगावात ‘वंचित’चा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा!

December 19, 2025
पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद

December 19, 2025
मुंबई महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडी सज्ज, उमेदवारीसाठी इच्छुकांची दादरमध्ये तुफान गर्दी

मुंबई महानगरपालिका निवडणूक : वंचित बहुजन आघाडी सज्ज, उमेदवारीसाठी इच्छुकांची दादरमध्ये तुफान गर्दी

December 19, 2025
पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; पहिल्याच दिवशी ३२ इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; पहिल्याच दिवशी ३२ इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी

December 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home