अकोला – अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत 20 जून पर्यंत वाढवावी. तसेच विद्यार्थ्यांनाप्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात याबबतेचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तेल्हारा तहसिल कार्यालयस देण्यात आले.
,
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच या वर्षामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुरू केली असून त्याची मुदत ५ जून २०२५ रोजी संपत आहे. या ऑनलाइन चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना फार मोठा त्रास होत आहे. ही साईड बंद असते व अनेक वेळा नेटवर्क उपलब्ध नसते अशा तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत आहेत. ही प्रकिया करण्यासाठी कॉम्प्युटर सेंटरवर मोठ्या प्रमाणावर लाईन लागली असून मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांकडून पैसा वसूल केला जात आहे. मागच्या वर्षी ग्रामीण भागामध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जात होता. ती पद्धत यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात यावी. ऑनलाइन पद्धती बाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अपूर्ण आहे.. ५ जून २०२५ तारीख ही शेवटची शासनाने दिलेली आहे. परंतु ग्रामीण भागातील आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ मोबाईल नसल्यामुळे OTP पण देण्याची अडचण आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण आणि शहरी भागाकरिता ऑनलाइन व ऑफलाइन पद्धत प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी. तसेच २० जून पर्यंत किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली. या मागणीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
समता सैनिक दलाच्या कार्यकर्ती रूपाली खांडेकर यांचे सर्पदंशाने निधन; वंचित आघाडी पदाधिकाऱ्यांची सांत्वन भेट
अकोला तालुक्यातील पळसो बढे गावात समता सैनिक दलात कार्यरत असलेल्या 21 वर्षीय रूपाली खांडेकर यांचे झोपेमध्ये सर्पदंशाने दुर्दैवी निधन झाले....
Read moreDetails